गुणतालिकेत टाकले मागे
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
बांगलादेशने आर्यलँडला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात चार धावांनी पराभूत केलं. या विजयानंतर बांगलादेशच्या संघानं आर्यलँडविरोधात झालेल्या तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकली. या मालिकेत मिळालेल्या यशानंतर बांगलादेशने विश्वचषक सुपर लीगच्या गुणतालिकेत भरारी घेतली आहे. बांगलादेशने मालिका जिंकून गुणतालिकेत भारताला मागे टाकलं आहे.
विश्वचषक सुपर लीगच्या गुणतालिकेत बांगलादेशचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. तर, भारतीय क्रिकेट टीम चौथ्या स्थानावर आहे. यंदाच्या विश्वचषकाचं यजमानपद भारत भूषवणार आहे. त्यामुळे भारताला विश्वचषकमध्ये थेट प्रवेश मिळाला आहे. भारताशिवाय आणखी सात संघांना थेट प्रवेश मिळाला आहे. न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, अफगानिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा यात समावेश आहे.
एकदिवसीय विश्वचषक क्वालिफिकेशन राऊंडची सुरुवात 18 जूनपासून होणार असून, 19 जुलै शेवटची तारीख असणार आहे. या राऊंडमध्ये झिम्बाब्वे, श्रीलंका, वेस्टइंडिज आणि आर्यलँड संघ सहभागी होणार आहे. याशिवाय नेपाळ, ओमान, स्कॉटलँडस, नेदरलँड्स आणि यूएईचा संघही क्वालिफिकेशन राऊंडचा भाग असणार आहे. ही टूर्नामेंट झिम्बाब्वेमध्ये खेळवण्यात येणार आहे.