मुंबईत बांगलादेशी घुसखोरांचे वाढते प्रमाण

| मुंबई | वृत्तसंस्था |

मुंबईत दहशदवाद विरोधी पथकाने चार बांगलादेशी नागरिकांना पकडल्याच्या बातमीने राज्यात चिंतेचे वातावरण आहे. बांगलादेशी घुसखोरांचे वाढत प्रमाण लक्षात घेता राज्यातील अनेक शहरे ही ज्वालामुखींच्या तोंडवर उभी आहेत, अशी चिंता आता पोलिस व्यक्त करत आहेत.

नुकतीच महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने मुंबईतून चार बांगलादेशींना अटक केली, त्यांच्या चौकशीत यातील दोन बांगलादेशींनी भारतीय पारपत्राच्या मदतीने लोकसभा निवडणूकीत उत्तर पश्चिम मतदारसंघात मतदान केल्याची माहिती समोर आले आहे. चालू वर्षात म्हणजेच जानेवारी ते जून 2024 मध्ये 177 बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात यश, त्यातील 81 जणांना स्वगृही बांगलादेशला पाठवण्यात पोलिसांना यश आले आहे.

पोलिस तपासात मिळालेल्या माहितीनुसार, असंख्य बांगलादेशी हे आजही भारतात वास्तव्यास आहेत. कोलकत्ता मार्गे हे बांगलादेशी अवघ्या 30 हजारात सीमा ओलांडून भारतात येतात. कोलकत्तातील स्थानिक गावांमधून यांना सुरूवातीला ओळखपत्र एजंटमार्फत दिली जातात. मात्र, कोलकत्तात कामाची कमतरता आणि पैसे कमी मिळत असल्याने हे बांगलादेशी मुंबई किंवा गुजरातमधील सूरतची वाट धरतात. मुंबईत शिवडी, मालवणी, मालाड, शिवाजीनगर, मानखुर्द, ट्राम्बे, भिवंडी या भागात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी हे वास्तव्याला असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

कायद्याचा होतोय गैरवापर?
विशेष म्हणजे मुंबईत पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले जाते. अनेकांकडे बोगस आधारकार्ड असल्याने ते कोर्टात सादर केल्यावर हा बांगलादेशी कशावरून यावरही प्रश्न उपस्थित केले जातात. न्यायालयात जामिनावर या बांगलादेशींना मुक्तता मिळते. त्यामुळे जो पर्यंत खटला सुरू रहतो. तोपर्यंत हे बांगलादेशी न्यायालयाने दिलेल्या अटींचे पालन करत, मुंबईत मुक्त संचार करत असतात. कारण मुंबईत विना परवाना वास्तव्य करणाऱ्यांना परदेशी नागरिकांना ठेवण्यासाठी 'डिटेशन सेंटर' नाहीत. त्यामुळेच अनेक बांगलादेशी आजही मुंबईत वास्तव्यास आहेत. मुंबईत बांगलादेशींची वाढती संख्या पोलिसांची डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र आहे.
Exit mobile version