| पनवेल | वार्ताहर |
आसुडगाव सेक्टर-4 भागात बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या 13 बांग्लादेशी नागरिकांना अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाकक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल आहेर यांनी सदर बांग्लादेशी नागरिकांना पकडण्याची सूचना केल्या होत्या. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक निलम पवार व त्यांच्या पथकाने संशयीत घरावर छापा मारला. या कारवाईत पकडण्यात आलेल्यामध्ये आठ पुरुष व पाच महिलांचा समावेश असून हे सर्व बांग्लादेशी नागरिक बांधकाम साईटवर मजुरी करुन तसेच घरकाम करुन रहात असल्याचे तपासात आढळुन आले आहे.
यावेळी रमजान मंडल (43), हबिबुल सहाजी (38), निजामुद्दीन शेख (27), समिन गाझी (22), जियरुल गाझी (42), साहेब मंडल (40), कबिर गाझी (46), रियाज शेख (22), तसेच मफुजाबिबि खातुन (27), शिवली शहजी (28), शरीनाबिबि गाझी (34) आणि आसमा मंडल (29) हे त्याठिकाणी बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असल्याचे आढळुन आले. त्यामुळे पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्या मुळ गावाबाबत विचारणा केली असता, त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यांनी बांग्लादेशातील उपासमारीला कंटाळून बेकायदेशीरीत्या भारतात प्रवेश केल्याची कबुली दिली. त्यानुसार या सर्वांना अटक करण्यात आली आहे.