| रसायनी | वार्ताहर |
रसायनी परिसरातील नवीन पोसरी मोहोपाडा येथे 52 वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रसायनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन पोसरी मोहोपाडा येथे धर्मा खारकर यांची चाळ रूम नं. 2 येथे राहत असणारे महेंद्र जंगली कनोजिया (वय 52, मुळ राहणार चौबेपूर, वाराणसी-उत्तरप्रदेश) यांनी दारुच्या नशेत रुममधील लाकडी भालाला नायलॉनच्या रस्सीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत रसायनी पोलीस ठाण्यात मुलगा विकास महेंद्र कनोजिया (वय 22) याने रसायनी पोलीस ठाण्यात खबर दिली असून, रसायनी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ बालवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. 1430 साळुंखे अधिक तपास करीत असून मयताचे आत्महत्याचे कारण अजून स्पष्ट झाले नसून रसायनी पोलिस पुढील तपास करीत आहेत.