बांगलादेशचा अफगाणवर एकतर्फी विजय

| धरमशाला | वृत्तसंस्था |

अफगाणिस्तानचे आव्हान एकदमच किरकोळ ठरवून बांगलादेशने एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत शानदार सलामी दिली. 92 चेंडू आणि 6 विकेटने त्यांनी हा सामना जिंकला. हिमाचल प्रदेशमधील डोंगराच्या कुशीत असलेल्या धरमशाला स्टेडियमवर प्रदीर्घ कालावधीनंतर झालेला हा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना 50-50 षटकांचा होता; परंतु दोन्ही मिळून 72 षटकांचाच झाला.प्रथम फलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तानला 37.2 षटकांत 156 धावांत रोखल्यावर बांगलादेशने हे माफक आव्हान 34.4 षटकांत पूर्ण केले. तीन विकेट आणि अर्धशतक अशी अष्टपैलू कामगिरी करणारा मेहदी हसन सामन्यात सर्वोत्तम ठरला.

प्रथम फलंदाजी मिळालेल्या अफगाणिस्तानने 2 बाद 112 अशी आश्वासक सुरुवात केली होती, परंतु त्याचा फायदा त्यांना घेतला आला नाही. मधल्या फळीने तर निराशा केलीच, परंतु तळाच्या फलंदाजांनीही कच खाल्ली. 2 बाद 112 वरून त्यांनी निम्मा संघ 122 धावांत गमावला आणि त्यानंतर उरलेले पाच फलंदाज संघाच्या 156 धावांवर गमावले.संक्षिप्त धावफलक अफगाणिस्तान 37.2 षटकांत सर्वबाद 156 (रहमुल्ला गुरबाझ 47, इब्राहिम झद्रान 22, अझमतुल्ला ओमझारी 22, शौरिफुल इस्लाम 34-2, शकिब अल हसन 30-3, मेहदी हसन 25-3) पराभूत वि. बांगलादेश 34.4 षटकांत 4 बाद 158 (मेहदी हसन 57 , नजमुल हुसैन शांतो नाबाद 59, फझलहक फारुकी 19-1, ओमझारी 9-1)

Exit mobile version