बँक ऑॅफ महाराष्ट्राचा महाकृषी मेळावा

। पोयनाड । वार्ताहर ।
बँकेची कर्ज वाटपाची गती कायम रहावी, ग्राहक संपर्क वाढावा यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र नवी मुंबई झोनच्या वतीने क्षत्रिय समाज सभागृह कुरूळ अलिबाग येथे महाकृषी मेळावा संपन्न झाला. यावेळी व्यासपिठावर सोमनाथन सहाय्यक प्रबंधक बँक ऑफ महाराष्ट्र, उज्वला वानखेडे कृषीअधिकारी रायगड, रविंद्र देवकर झोनल प्रमुख नवी मुंबई, सिद्वेश राऊळ जिल्हा प्रबंधक आर्थिक समावेश महाबँक इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
प्रमुख अतिथी उज्वला वानखेडे म्हणाल्या कोव्हिडमध्ये सर्व व्यवहार बंद होते. पण अ‍ॅग्रीकलचर क्षेत्रातील उद्योग सुरू होते. कृषी व्यवसाय कधीही न थांबणारा व्यवसाय आहे. बँक ऑफ महाराष्ट्र शेतकर्‍यांना आर्थिक सहकार्य देत आहे. बँका, कृषी खाते, शासन तुमच्या मदतीला आहे. शासन, बँक व तुम्ही एकत्र येवून मोठ काम करू शकता. शासनाने प्रधानमंत्री शुश्म अन्न प्रक्रिया योजना सुरू केली आहे. योजनेचा लाभ घ्या असे त्या म्हणाल्या
तसेच यावेळी सोमनाथन सहाय्यक प्रबंधक बँक ऑफ महाराष्ट्र, रविंद्र देवकर, सिद्वेश राऊळ यांनी मार्गदर्शन केले. तर पुनम बर्‍हाडे यांनी बँकेच्या कर्ज योजनांची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमा दरम्यान शेतकरी व महिला बचत गटांना मान्यवरांच्या हस्ते कर्ज वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिल्पा शिंदे, आभार विनोद साळवे यांनी मानले.

Exit mobile version