35 लाभार्थ्यांना दिले कर्ज मंजुरी पत्र
। अलिबाग । वार्ताहर ।
आर्थिक सेवा विभाग, भारत सरकार यांच्या सूचनेनुसार अणि जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनानुसार अलिबागमध्ये जिल्हा अग्रणी बँकेतर्फे महाकर्ज मेळाव्याचे क्षत्रिय समाज हॉल कुरुळ येथे आयोजन करण्यात आले. या बँक कर्ज मेळाव्यामध्ये अलिबाग तालुक्यातील 10 शासकीय बँकांनी सहभाग घेतला. त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय, पोस्ट पेमेंट बँक, स्वयंसहायता समूहाचे स्टॉल,स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान, रायगड यांचे स्टॉल लावण्यात आले होते. या मेळाव्यास अलिबाग तालुक्यातील जनतेकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. यावेळी जिल्हाधिकारी श्री. डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते 35 लाभधारकांना विविध बँकांमार्फत मंजूर करण्यात आलेले पीक कर्ज, मुद्रा कर्ज, बचत गट कर्ज, उद्योजक यांना मुद्रा कर्ज मंजुरी पत्र देण्यात आले. या मेळाव्यास अलिबाग परिसरातील जनतेचा प्रचंड प्रतिसाद लाभला. या वेळी कार्यक्रमास उपविभागीय व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया रमण पारकर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विजय कुलकर्णी, जिल्हा कृषी अधीक्षक उज्वला बाणखेले, सहायक आयुक्त, मत्स्यव्यवसाय सुरेश भारती, नाबार्डचे उप जिल्हा व्यवस्थापक सुधाकर रगतवन, सिद्धेश राऊळ तसेच अलिबाग मधील सर्व बँकाचे शाखाधिकारी, विपणन अधिकारी, व्यवसाय प्रतिनिधी यांची प्रमुख उपस्थिती होती.