ऑगस्टमध्ये ११ दिवस बँका बंद

शासकीय कार्यालयेसुद्धा बंद राहणार
| मुरुड जंजिरा | वार्ताहर |

ऑगस्ट महिन्यात एक-दोन नव्हे, तर तब्बल 11 दिवस शासकीय कार्यालये आणि बँका सुट्टीमुळे बंद राहणार आहेत. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांनी आपापले दैनंदिन आवश्यक व्यवहार त्याआधीच पूर्ण करून घ्यावेत.

11 दिवस बँकांना सुट्टी असल्याने एटीमवर मोठा ताण मात्र निश्‍चित पडणार आहे.शासकीय कार्यालयेदेखील बंद राहणार असल्याने महसुली, जमीन व्यवहार, सहकार क्षेत्र, चेक क्लिअरिंग, शाळा, कोर्ट केसेस, पंचायत समितीतील व्यवहार आणि अन्य खात्याचा यामध्ये समावेश आहे. 7 ऑगस्ट रविवारपासून सुट्टीची मालिका सुरू होणार आहे. हिंदू- मुस्लिम धर्मियांचे सण ऑगस्ट महिन्यात असल्याने सुट्ट्या ची संख्या आधिक दिसून येते. 9 ऑगस्टला मोहरम सण आहे. 13 आणि 27 ऑगस्टला दुसरा आणि चौथा शनिवार, तर 14, 15,16 ऑगस्टला सलग सुट्टी आहे.

28 ऑगस्टला रविवार, तर 31 ऑगस्टला श्री गणेश चतुर्थीची सुट्टी आहे. ऑगस्ट महिन्याचे वैशिष्ट्य म्हणजे, नागपंचमी, मोहरम, श्रावण, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जयंती, पारसी नूतन वर्ष, स्वातंत्र्यदिन, गोपाळकाला, गणेश चतुर्थी असे महत्त्वाचे सण याच महिन्यात आहेत.

Exit mobile version