| रायगड | खास प्रतिनिधी |
सप्टेंबर महिन्यात तब्बल आठ दिवस बँका बंद राहणार आहेत. सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खासगी क्षेत्रातील बँका, परदेशी बँका आणि सहकारी बँका राष्ट्रीय सुट्यांच्या दिवशी बंद राहणार आहेत. त्यामुळे ग्राहकांची चांगलीच गैरसोय होणार आहे. मात्र, इंटरनेट बँकिंग सेवा आणि एटीएम सेवा कार्यरत असल्याने ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना आता अचूक नियोजन करावे लागणार आहे.
सप्टेंबर महिना हा सणासुदीचा महिना राहणार आहे. या कालावधीत नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. सर्वच ठिकाणी ऑनलाइन व्यवहार केले जात नाहीत. त्यामुळे नागरिकांना पैशाची गरज लागणार आहे. सप्टेंबर महिन्यात आठ सुट्या असल्याने या कालावधीत बँकांचे व्यवहार बंद राहणार आहेत. परंतु, एटीएम आणि इंटरनेट बँकींगने व्यवहार करता येणार आहेत.
अशा आहेत सुट्या आगामी महिन्यात 3 सप्टेंबर रोजी रविवार, 9 सप्टेंबर दुसरा शनिवार, 10 सप्टेंबर रविवार, 17 सप्टेंबर रविवार, 19 सप्टेंबर गणेश चतुर्थी, 23 सप्टेंबर चौथा शनिवार, 24 सप्टेंबर रविवार, 28 सप्टेंबर अनंत चतुर्दशी, ईद मिलाद अशा शासकीय सुट्या या महिन्यात आल्या आहेत.