। पनवेल ग्रामीण। दीपक घरत |
रात्री उशिरा पर्यंत चालणार्या डान्स बार आणि ऑर्केस्ट्रा बारमुळे बदनाम असलेल्या नवी मुंबई आणि पनवेल परिसरातील बार चालकांनी आपल स्वतःच चलन बाजारात आणल्याचा धक्कादायक प्रकार पाहायला मिळत आहे. बार बालानवर उधळण्यासाठी आता पैशा ऐवजी चलनाचा वापर केला जात आहे. महत्वाचे म्हणजे ग्राहकांनी दिलेल्या चलनी नोटांच्या बदल्यात देण्यात येणारे चलन फक्त त्याच बारमध्ये वापरता येत असल्याने ग्राहकाला कंगाल होऊनच बार बाहेर पडावं लागत आहे.
डान्स बार आणि ऑर्केस्ट्रा बारमधील बारबालांनवर सध्या पैशा ऐवजी आकडे छापलेल्या कुपनची उधळण केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे. पैशाची उधळण करण्याला बंदी असल्याने बार चालकांनी नवी शक्कल शोधल्याचे बोलण्यात येत आहे. तर बंदी नोट सुट्टी करुण देणार्यांनी कमिशन मध्ये वाढ केल्याने भारतीय चलणाच्या बदल्यात कुपन द्यायला बारचालकांनी सुरवात केल्याचे जानकरांचे म्हणणे आहे. पनवेल तालुक्यात एकूण 24 सर्व्हिस आणि ऑर्केस्ट्रा बार आहेत. यामध्ये पनवेल तालुका पोलिस ठाण्याच्या अंतर्गत 10 बार, पनवेल शहर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत 9, कळंबोली 3 आणि तळोजा पोलिस ठाण्याच्या अंतर्गत 2 बारचा समावेश आहे. हे बार कागदोपत्री सर्व्हिस आणि ऑर्केस्ट्रा म्हणून ओळखले जात असले. तरी प्रत्यक्षात या बारमधील लेडी वेटर्स प्रत्यक्षात नृत्यांगना म्हणून काम करतात. या नृत्यांगनावर पैसे उधळण्यासाठी मोठ्या संख्येने ग्राहक लेडीज बारमध्ये येत असतात आशा वेळी ग्राहकाला देण्यासाठी बार चालकाकडे असलेले सुट्टे पैसे कमी पडत असल्याने सुट्टया पैशा ऐवजी कुपनचा वापर केला जात असल्याची शक्यता आहे.
चालणावर दिले जात आहेत देशभक्ती पर संदेश
महत्वाचे म्हणजे बारचालकांनी छापलेल्या चलनावर देशभक्तीचे संदेश दिले जात असून, नो करन्सी ओन्ली कुपन असा उल्लेख देखील कुपन वर करण्यात आलेला आहे.
हुबेहूब नोटांच्या अकारातील कागदी चलन
बार मध्ये जाणारे अनेक आंबट शौकीन ग्राहक मोठ्या रकमेच्या चलनी नोटा आपल्या सोबत घेऊन जातात. मोठ्या रकमेच्या नोटा उधळणे शक्य होत नसल्याने असे ग्राहक बार चालकाला मोठ्या रकमेची नोट देऊन त्या बदल्यात सुट्टया नोटा घेत त्यांची उधळण बार बालावर करतात. तर सुट्टे देण्याच्या नावावर बार चालक एक ठराविक रक्कम कापूनच ग्राहकांच्या हातात उर्वरित रक्कम ठेवतात.
भारतीय चालणाच्या बदल्यात स्वतःच चलन योग्य कि अयोग्य. भारतीय चालणाच्या बदल्यात आपल्याकडील स्वतःच चलन देणे हा प्रकार नियंबाह्य असून, कायद्याला बगल देण्यासाठी बार चालक असले प्रकार करत आहेत. शासनाने या वर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे.
अॅड.काशिनाथ ठाकूर
प्रहार जनशक्ती पक्ष सरचिटणीस