बारामती कोर्टाकडून अजित पवारांना समन्स

निवडणुकीचा मुद्दा न्यायालयात

| पुणे | प्रतिनिधी |

उमुख्यमंत्री अजित पवार यांना 2014 च्या निवडणुकांमध्ये केलेल्या एका वक्तव्यामुळे बारामतीच्या कोर्टाकडून समन्स बजावण्यात आलं आहे. याचिकाकर्ते सुरेश खोपडे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. अजित पवारांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उमेदवाराला मतदान केलं नाही तर गावचं पाणी बंद करु, असं वक्तव्य केलं होतं.

माझी आयपीएस अधिकारी सुरेख खोपडे यांनी अजित पवारांच्या याच वाक्याविरोधात याचिका दाखल केली आहे. सुरेश खापडे हे 2014 मध्ये आप पक्षाचे उमेदवार होते. त्यावेळी देखील त्यांनी यासंदर्भात तक्रार केली होती. त्यानुसार बारामती कोर्टाने अजित पवारांना हे समन्स बजावलं आहे. तसेच त्यांन 26 नोव्हेंबर रोजी कोर्टात हजर राहण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. याचिकाकर्ते सुरेश खोपडे यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना यासंदर्भात माहिती दिली आहे.
अजित पवार यांनी 2014च्या लोकसभा निवडणुकांसाठी प्रचार करताना गावकर्‍यांना ही दमदाटी केल्याची माहिती आहे. बारामतीमधील मासाळवाडी या गावमध्ये अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना मतदान करण्यासाठी दौरा केला होता. त्याचवेळी या गावात पाणीटंचाई भीषण प्रश्‍न होता. तेव्हा दादांन ‘सुप्रिया सुळे यांना मतदान केलं नाही तर गावचं पाणी बंद करु. तुमचा दोन महिन्यांत पाणीप्रश्‍न सोडवतो.. आम्हालाच मतदान करा… अशी दमदाटी अजित पवारांनी बारामतीमधील गावकर्‍यांना केल्याचा आरोप आहे.

Exit mobile version