। बारामती । प्रतिनिधी ।
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीची विधानसभा पोटनिवडणूक 23 एप्रिल रोजी पार पडली. आज सकाळी 8 वाजल्यापासून बारामती पोटनिवडणुकीच्या निकालाची मतमोजणी सुरु आहे. सुरुवातीपासूनच महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी जोरदार आघाडी घेतली. आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या 1 लाख 21 हजार 855 मतांनी आघाडीवर आहेत. सुनेत्रा पवारांची ही आघाडी आणखी वाढत जाणार असून विजयही जवळपास निश्चित असल्याचे बोलले जात आहे.






