बेशिस्त वाहन चालकांना दणका

| अलिबाग | वार्ताहर |

वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी दिवसभर कारवाई केली. या कारवाईत 149 चालकांकडून एक लाख चार हजार 900 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या बेशिस्त वाहन चालकांना पोलिसांनी दणका दिला आहे.

जिल्ह्यात वाढत्या औद्योगिकीकरणामुळे दळणवळणाचे साधने वाढली आहेत. दुचाकींसह अवजड वाहनांची संख्यादेखील झपाटयाने वाढू लागली आहेत. मात्र काही वाहन चालक वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करीत वाहन चालवित असल्याने अपघात होण्याचा धोका अधिक असतो. बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेमार्फत कारवाई सुरु करण्यात आली आहे. शुक्रवारी दिवसभर जिल्ह्यातील महामार्गसह वेगवेगळ्या ठिकाणी वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले. हेल्मेट नसणे, वाहन वेगाने चालविणे, वाहन चालविण्याचा परवाना नसणे, टीबलशीट असणे, ज्यादा प्रवासी वाहतूक करणे अशा अनेक नियमांचे उल्लंंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करीत त्यांच्याकडून एक लाख चार हजार 900 रुपयांचा दंड वसूल केला.

Exit mobile version