बाजार समिती निवडणूक ताकदीनिशी लढवणार

आ. श्यामसुंदर शिंदे यांचे प्रतिपादन

| कंधार| प्रतिनिधी |

सध्या रणधुमाळी सुरू असलेल्या कंधार कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून 01 ऑगस्ट रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती कंधार येथे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आ. श्यामसुंदर शिंदे समर्थकांच्या वतीने 09 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र कृषी उत्पन्न बाजार समिती कंधार येथे दाखल करण्यात आले. यामध्ये माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर पाटील चोंडे, पंचायत समिती सदस्य सत्यनारायण मानसपुरे, राम गोरे, प्रदीप हुंबाड, रमाकांत जोगदंड, गोपाळ जाधव, कमलकिशोर बुरपल्ले, संभाजी पानपट्टे, धनराज पाटील लुंगारे यांनी आपले नामनिर्देशन पत्र कंधार कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयामध्ये दाखल केले. शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षाआशा श्यामसुंदर शिंदे यांच्या माध्यमातून कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सर्व ताकदीनिश व विकास कामावर लढवणार असल्याचे यावेळी आ. श्यामसुंदर शिंदे यांनी सांगितले.

यावेळी लोहा खरेदी विक्री संघाचे उपसभापती श्याम अण्णा पवार, पारडीचे माजी सरपंच दिगंबर डिकळे, घोडजचे सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन नागोराव लाडेकर ,व्हाईस चेअरमन संभाजी लाडेकर, अशोक बोधगिरे, महेश पिनाटे, माजी सरपंच राष्ट्रपाल चावरे, उपसरपंच कृष्णा परोडवाड, अवधूत पेठकर, गंगाधर चिखलीकर, सुधाकर सातपुते, सिद्धू वडजे, सुनील सुपलकर, हनुमंत कदम सह बहुसंख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version