आमदारांनी केलेल्या मारहाणीनंतर बीडीओ रजेवरच

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

असेसमेंटवरील अनधिकृत घराचा शिक्का काढण्याच्या मागणीला नकार दिल्याने आमदार महेंद्र दळवी आणि राजा केणी यांनी गटविकास अधिकार्‍याला मारहाण केल्याची घटना 5 ऑगस्ट रोजी घडली होती.

अलिबाग पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे यांच्या दालनातच हा प्रकार घडला होता. या प्रकारानंतर दहशतीमुळे वैद्यकीय रजेवर गेलेले गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे दोन महिने उलटून गेले तरी पुन्हा सेवेवर हजर झालेले नाही. त्यांनी बदलीची मागणी केली आहे. असेच प्रकार घडत राहिले तर मात्र जिल्ह्यात आणि विशेष करुन अलिबाग तालुक्यात कोणीही अधिकारी काम करण्यास तयार होणार नाही, अशी भीती व्यक्त होत आहे.

Exit mobile version