। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मुख्यालय बदली अहवालासाठी ग्रामसेवकाकडून लाच मागणाऱ्या गटविकास अधिकारी मांगु नारायण गढरी यास अलिबाग न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली असून जामीन देण्यास नकार दिलेला आहे.
पेण पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी मांगु नारायण गढरी,(वय53वर्ष सहाय्यक गट विकास अधिकारी, अतिरिक्त कार्यभार गटविकास अधिकारी(,वर्ग २) पेण, तालुका पेण जिल्हा रायगड) यांनी मुख्यालय बदली अहवालासाठी
पेण तालुक्यातील तक्रारदार ग्रामसेवक यांच्याकडून मुख्यालय बदलीसाठी पंधरा हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यासंदर्भात तक्रारदार यांनी लाचलुचपत विभाग अलिबाग रायगड यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार लाचलुचपत विभागाच्या उपअधीक्षक सुषमा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या पथकाने सापळा रचून आरोपी लोकसेवक प्रभारी गटविकास अधिकारी मांगु नारायण गढरी यास रंगेहात पकडले. पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, पोलीस हवालदार कौस्तुभ मगर, विवेक खंडागळे, स्वप्नाली पाटील या पथकाने ही कारवाई केली होती.
आज दिनांक 24 जून 2022 रोजी आरोपी लोकसेवक प्रभारी गटविकास अधिकारी मांगु नारायण गढरी यास अलिबाग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र जामीन देण्यास नकार दिला आहे.