सतर्क रहा! हेटवणे धरणाचे 6 दरवाजे उघडले

| पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील हेटवणे धरण 89 टक्के भरले असून धरणाचे 6 ही दरवाजे मोकळे ठवले आहेत. तसेच प्रती सेकंद 9.44 घन मीटर एवढया पाण्याचा विसर्ग भोगावती नदीमध्ये होतअसल्याची माहिती दैनिक कृषीवलशी बोलताना कार्यकारी अभियंता आकाश ठोंबरे यांनी दिली आहे.

भोगावती नदी दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सतर्क राहण्याचे आदेश पेण तहसील कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. तसेच कामाव्यतीरिक्त नदीकाठावरील गावातील नागरीकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन तहसिलदार तानाजी शेजाळ यांनी केले आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने पेण शहरासह अंतोरा, पाटणोली, नवघर, सापोली, वरेडी, कणे, या गावांमध्ये पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तरी नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

याशिवाय पेण शहराच्या पुर्व भागातील रहिवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन नगरपालिकेचे मुख्यांधिकारी जीवन पाटील यांनी केले असून काही आपत्कालीन स्थिती झाल्यास पेण नगरपालिकेच्या आपत्कालीन कक्षेशी संपर्क साधावा. कर्मचारी सतर्क असल्याचेही त्यांनी सांगितले.

Exit mobile version