इंटरनेटच्या माध्यमातून होणारी फसवणूक टाळण्यासाठी जागृत रहा

। खोपोली । प्रतिनिधी ।
सयाबर गुन्हे घडताना सोशल मिडीया,फेसबुक, इस्टा,टेलिग्राम सारख्यांवर आपली खरी माहिती देत असतो सर्व पोस्ट पाठवत असतो त्यामुळे सायबर गुन्हे घडत आहेत.त्यामुळे सायबर गुन्ह्यात आपला सहभाग असल्याशिवाय गुन्हा घडत नाहीत,इंटरनेटच्या माध्यमातून होणारी फसवणूक टाळण्यासाठी मोबाईल तंत्रज्ञानाच्या भाणगडीत पडू नका जागृत रहा तरच सायबर गुन्हे आटोक्यात येतील असा विश्‍वास खोपोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक शिरीष पवार यांनी जनता विद्यालय येथे आयोजित कार्यक्रम बोलताना व्यक्त केला आहे.
यावेळी इंटरनेटच्या माध्यमातून कसे फसविले जाते यासंदर्भातील चित्रफीत दाखविण्यात आली. सायबर गुन्हे हे सोशल मिडियावरील फेसबुक, इस्टा,व्हँटसप,टेलिग्राम इतर माध्यम डाऊनलोड करताना आपली खरी माहिती देत असतो त्यामुळेच आपले फेक आकाऊंट बनवूच आफली फसवणूक होते.सध्या आँनलाइन कोरोना लसीकरण, परिक्षेचा फार्म भरताना पैसाची लुट होत आहे,मोबाइल ब्लँक करून लुट,वाहनाची दंड पावती भरणेसाठी काँल,फेसबुक लाईव्ह व्हिडिओ चँट करताना आपली रेकार्डिंग करून ब्लँकमेलिंग करणे आदि सायबर गुन्हेगारी विषयी पोलिस निरिक्षक शिरीष पवार यांनी माहिती दिली. अनओळखी माणसाला आकाऊटचा ओटीपी नंबर,सीव्हीइ नंबर देवू नका. कोणताही मेसेज खात्री केल्याशिवाय फाँरवर्ड करू नका असे सांगत प्रत्येक सायबर गुन्ह्यात आपला सहभाग असल्याशिवाय गुन्हा घडत नाहीत. त्यामुळे आपला सहभाग अजिबात नोंदवू नका असे पवार यांनी सांगितले. यावेळी किशोर पाटील, दिलीप पोरवाल,राजू अभाणी, दिनेश गुरव, दिशा राणे, शाळांचे शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.

Exit mobile version