| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड तालुका राज्यात प्रथम कोरोनामुक्त तालुका होता. याच तालुक्यात आता कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू वाढत चालला आहे. त्यामुळे पुन्हा नागरिकांनी चिंचा वाढली आहे. तालुक्यात चौथ्या लाटेचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत चालला असून, नागरिकांनी सावधगिरी बाळगणे जरूरी आहे. रविवारी तीन कोरोना बाधित रुग्ण आढळले असून, तालुक्यातत एकूण रुग्णांची संख्या आठ झाली आहे. बोर्ली 5, ताराबंदर 1, कोर्लई 1, मांडला 1 रुग्ण बाधित आहे. त्यांच्यावर उपचार करून त्यांना होम विलिकरण (घरी) ठेवण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनासह सर्वसामान्य नागरिकही चिंता व्यक्त करीत आहे. तालुक्यात पहिल्या लाटेत शहरात कोरोनाचा उद्रेक झाला होता. त्यामध्ये 111 जणांनी जीव गमावला होता. यानंतर दुसर्या व तिसर्या लाटेत शहरवासियांनी डॉक्टर व नर्सच्या साह्याने कोरोनाचा यशस्वीपणे मुकाबला केला. परंतु, आता पुन्हा तीन कोराना रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे.