‘स्वसंरक्षणासाठी शारीरिकदृष्ट्या सक्षम राहा’

। पाली । वार्ताहर ।

स्त्री जर मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम असेल तरच कोणत्याही बिकट प्रसंगात स्वतःचे संरक्षण करू शकते, असे प्रतिपादन प्रमुख मार्गदर्शक अश्‍विनी गाडगीळ यांनी केले. जिल्हा व महिला बाल विकास तसेच एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, सुधागड यांच्या विद्यमाने ग.बा. वडेर हायस्कूल पाली येथे राजमाता जिजाबाई युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.

गुरुवारी आयोजित केलेल्या या कार्यशाळेला 9 वी ते 12 वीच्या शेकडो तरुणी सहभागी झाल्या होत्या. यावेळी प्रभारी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अधिकारी रंजना म्हात्रे, मुख्याध्यापक भाऊसाहेब घोडके, प्रमुख पाहुण्या अश्‍विनी घाडगे, प्रमुख मार्गदर्शक अश्‍विनी गाडगीळ, उपमुख्याध्यापक बी.एस. माळी, राष्ट्र सेवा समिती शुभांगी जोशी, पाली पोलीस ठाण्याच्या ए.पीआय अश्‍विनी मोहिते, सहाय्यक गटविकास अधिकारी महामुनी, पोलीस हवालदार सावंत आदींसह महिला व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Exit mobile version