आगामी निवडणुकांसाठी सज्ज रहा

अँड.आस्वाद पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

| माणगाव । प्रतिनिधी ।

शेतकरी कामगार पक्षाने नेहमीच सर्वसामान्य जनतेच्या हिताचा विचार करत विकासात्मक दृष्टिकोन ठेवला आहे. केंद्रात आणि राज्यात वाहत असलेल्या राजकीय वार्‍यांमुळे अनेकराजकीय पक्षांना फटका बसला आहे. असे असलेतरीशेतकरी कामगार पक्षाने आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. लवकरच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये शेतकरी कामगार पक्षाची ताकद दाखविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहायला हवे. असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनी केले.

माणगाव तालुका शेतकरी कामगार पक्षातर्फे कृषी उत्पन्न बाजार समिती माणगांव येथे बुधवार दि.7 फेब्रुवारी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांसंदर्भात श्रीवर्धन विधानसभा मतदार संघाची पूर्वनियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला शेकापचे जिल्हा चिटणीस अ‍ॅड.आस्वाद पाटील , माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश खैरे, गौतम पाटील, प्रदीप नाईक,अ‍ॅड.परेश देशमुख, माणगाव तालुका शेकाप चिटणीस रमेश मोरे, माणगाव तालुका सहचिटणीस राजेश कासारे, तळा तालुका चिटणीस ज्ञानेश्‍वर भोईर, म्हसळा तालुका चिटणीस संतोष पाटील, श्रीवर्धन तालुका चिटणीस वसंत यादव, देगाव उपसरपंच दिनेश गुगले, मोर्बा माजी उपसरपंच अमोल मोहिते, मधुकर अर्बन, स्वप्नील दसवते आदींसह श्रीवर्धन मतदार संघातील पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या बैठकीत अ‍ॅड.आस्वाद पाटील यांनी येणार्‍या लोकसभा व विधानसभा निवडणुकांसंदर्भात श्रीवर्धन विधानसभा मतदार संघाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मतदार संघात सर्व ठिकाणी निवडणूक केंद्र समिती तयार करा. प्रत्येक केंद्र समितीवर प्रमुखाची नेमणूक करा. प्रत्येक केंद्राचा अहवाल आपल्याला हवा आहे. निवडणूक केंद्राप्रमाणे याद्या तयार करा. नगरपंचायत प्रभागानुसार याद्या तयार करा. हि सर्व माहिती घेऊन येत्या 27 फेब्रुवारीला तालुका चिटणिसांनी अलिबाग येथे पक्ष कार्यालयात यावे. अशा सूचना अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनी केल्या.

माणगाव तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी श्रीवर्धन मतदार संघात 351 बूथ असून आपल्याला बूथ प्रमाणे काम करायचे आहे. सध्याचे घाणेरडे राजकारण पाहता आपल्याला आपला पक्ष अधिकतम मजबूत करण्याच्या इराद्याने काम करून येणार्‍या सर्वच निवडणुका पूर्ण ताकदीनिशी लढायच्या असल्याचे सांगितले. या बैठकीत मतदार संघातील कार्यकर्त्यांनी आपली मते मांडून हि बैठक उत्साहात संपन्न झाली.

Exit mobile version