शिक्षकांच्या मुलभूत प्रश्‍नांसाठी बाळाराम पाटील यांना विजयी करा

शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांचे आवाहन
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
महाविकास आघाडीचे कोकण शिक्षक मतदार संघातील बाळाराम पाटील यांच्या प्रचारार्थ शेकापचे सरचिटणीस आ.जयंत पाटील यांनी खोपोली शहरातील शिक्षक मतदारांशी संवाद साधून शिक्षकांच्या मुलभूत प्रश्‍नांसाठी मविआचे उमेदवारी बाळाराम पाटील यांना बहुमताने निवडून देण्यासाठी मतदान करावे असे आवाहन केले.

खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, वसंत देशमुख मेमोरियल ट्रस्ट तसेच खोपोली शहरातील विविध शाळांतील शिक्षक मतदारांशी त्यांनी संवाद साधला. बाळाराम पाटील हे मागील कार्यकाळात शिक्षकांच्या विविध प्रश्‍नांसाठी ज्या आक्रमकतेने महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभागृहात आवाज उठवत होते याचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे. अत्यंत अभ्यासु, संवेदनशील आणि शिक्षकांच्या सर्वांगीण प्रश्‍नांची जाण असलेला उमेदवार म्हणून त्यांचेकडे पाहीले पाहिजे असे ते म्हणाले.

यावेळी माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसुरकर, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ उल्हास देशमुख, राष्ट्रवादीचे मनेष यादव, मंगेश दळवी, कुलदीपक शेंडे, रमेश जाधव, शेकापचे संदीप पाटील, शाम कांबळे,अविनाश तावडे, कैलास गायकवाड, रवी रोकडे, जयंत पाठक, शांताराम पाटील यांची देखील त्यांनी भेट घेऊन बाळाराम पाटील यांच्या विजयासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम, कार्यवाह किशोर पाटील, सदस्य राजेश आभानी, दिनेश गुरव, वसंत देशमुख मेमोरियल स्कूलचे विक्रांत देशमुख हे देखील या दौर्‍यात सहभागी झाले होते.

प्रा. प्रताप पाटील, प्रा. प्रशांत माने पुरोगामी शिक्षक संघटनेचे जयंत पाटील, जितेंद्र देशमुख, राजेंद्र कुंभार, दत्तात्रय गव्हाणे, काशिनाथ गोरे, हेमंत खाडे, जगदीश मरागजे आणि शिक्षक वर्गासोबत आम. जयंत पाटील यांनी प्रत्यक्ष चर्चा केली.

शैक्षणिक साहित्य पुरवण्यात देखील भरीव कार्य केले आहे. भिडे वाड्यापासून मंत्रालय मुंबई पर्यंत पदयात्रेच्या माध्यमातून शिक्षकांच्या प्रश्‍नासाठी त्यांनी केलेले प्रयत्न सर्वांच्या लक्षात राहतील असेच आहेत. अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांच्या वाढत जाणार्‍या अडचणींच्या सोडवणुकीसाठी बाळाराम पाटील हे पर्याय ठरतील. – आ. जयंत पाटील, शेकाप सरचिटणीस

Exit mobile version