। नागपूर । प्रतिनिधी ।
भांडारा गावातील एका ट्रॅक्टरच्या दुकानात चोरी झाली. रात्री बे-रात्री फिरणाऱ्या टवाळखोर तरुणांनीच चोरी केल्याच्या संशयावरून ग्रामस्थांनी चौघांना जबर मारहाण केली. या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला.
भंडारा गावातील एका ट्रॅक्टरच्या दुकानात शनिवारी मध्यरात्री लोखंडी रॉडची चोरी झाली. गावातील टवाळखोर तरुणांनीच चोरी केल्याच्या संशयावरून 20 ते 25 जणांनी चौघांना जबर मारहाण केली. या मारहाणीनंतर गंभीर जखमी झालेल्या एकाचा मंगळवारी (दि. 15) सकाळी उपचारादरम्यान भंडारा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. तर इतर जखमींवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. या प्रकरणी मारहाण करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे.