| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
थुंकण्याचे कारण विचारले असता चौघांनी धक्काबुक्की करून हेल्मेटने एका तरुणाला मारहाण केली. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, विक्रांत ठाकूर हा रिस गाव-रसायनी येथे राहत असून तो 23 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास अभिनव जाधव यांच्यासोबत मोटरसायकलने पनवेलमधील ओएनजीसी सिग्नलजवळ आला. यावेळी बाजूला उभी असलेल्या इनोवा कारमधील एक व्यक्ती गाडी बाहेर थुंकला आणि ते विक्रांतच्या अंगावर उडाले. यावेळी दोघांनीही गाडी बाजूला घेतली. त्यानंतर कारमधून चार व्यक्ती खाली उतरले आणि विक्रांत जवळ आले. विक्रांतने त्यांना थुंकण्याचे कारण विचारले असता त्यांच्यात धक्काबुक्की झाली. यावेळी एकाने हेल्मेट घेऊन विक्रांतला मारहाण केली. त्यात तो जखमी झाला. त्यांच्या कारचा फोटो काढला असता एकाने तो फोटो डिलीट कर नाहीतर चावी देणार नाही, असे बोलला आणि तेथून पळ काढला.
थुंकण्याच्या कारणावरून हेल्मेटने मारहाण
