। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील कशेळे येथे उसने घेतलेले पैसे परत केल्यानंतर त्या पैशाचे व्याज घेण्यासाठी आल्याचा राग मनात धरून त्या व्यक्तीवर चार जणांनी लोखंडी रॉडने मारहाण केली. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी व्यक्तीवर कशेळे येथे उपचार सुरु आहेत.
कर्जत पोलीस ठाणे हद्दीत कशेळे येथील मुरबाड-कर्जत रस्त्यावरील अक्षदा मंगल कार्यालयासमोर सख्खे-चुलत भावांमध्ये आर्थिक व्यवहार झाले होते. दीड लाख रुपये उसने घेतले आणि ते पैसे परत केल्यावर त्या दोन भावांमध्ये व्याजाच्या रकमेवरून मंगळवारी (दि.6) वाद झाले. यावेळी चार जणांनी हातात असलेल्या लोखंडी रॉडने फिर्यादीच्या चुलत भावाच्या डोक्यावर आणि कंबरेवर मारुन गंभीर दुखापत केली. त्यानंतर मिञाचे व्याजाचे पैसे कसे देत नाहीस. तुला बघुन घेतो, अशी धमकी दिली आहे.
या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून याबाबत पोलीस उपनिरीक्षक सुरेश भालेराव हे अधिक तपास करीत आहेत.