| म्हसळा | वार्ताहर |
म्हसळा शहरातील शिवकृपा बँकेजवळ कारसमोर असणार्या स्कुल बसला गाडी पुढे घ्या सांगितल्याच्या रागातून स्कुल बस चालक आणि सोबत असणार्या 7 पर्यटकांनी कार चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. व्यंकटेश घाटोळे आणि अन्य 4 पुरुष आणि 3 महिला असे एकूण 8 जणांनी कारचालकाला मारहाण केली. फिर्यादी राहुल जैन हे आपल्या ताब्यातील कारमधून आपली बहीण आणि अन्य नातलग असे जात असताना कारसमोर असणार्या स्कुल बस चालकास बस पुढे करा मला जायचे आहे. अशी विनंती केली असता स्कूल बस चालक आणि बस मधील अन्य 4 पुरुष आणि 3 महिलानी एकत्रितपणे बस हलविण्यास नकार दिला आणि संगनमताने राहुल याला शिवीगाळ आणि मारहाण केली. याप्रकरणी बसचालकावर म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.