बोगस तृतीयपंथीला मारहाण

| पनवेल । वार्ताहर ।

भाऊबीजेच्या दिवशी घरोघरी भेट मागण्यासाठी फिरणार्‍या बोगस तृतीयपंथींना मारहाणीचा प्रकार खारघरमध्ये घडला. सणासुदीच्या दिवशीच हा प्रकार झाल्याने या वेळी परिसरातील बघ्यांची गर्दी झाली होती. खारघर, सेक्टर बारामधील बैठ्या चाळीत एक व्यक्ती साडी नेसून तृतीयपंथी असल्याचे सांगून भाऊबीजेची मागणी करीत होती. हा प्रकार तृतीयपंथींच्या दुसर्‍या एका गटाला समजला होता. याबाबतची विचारणा केल्यावर हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तिघा तृतीयपंथींच्या गटाने बोगस तृतीयपंथी बनलेल्या व्यक्तीला बेदम मारहाण केली होती. हा वाद पाहण्यासाठी गर्दी झाली होती. हे भांडण काही केल्या थांबत नसल्याचे अखेर खारघर भाजपचे सरचिटणीस दीपक शिंदे यांनी खारघर पोलिस ठाण्याशी संपर्क साधून ताब्यात दिले.

Exit mobile version