| नवीन पनवेल | वार्ताहर |
गाळ्यासाठी दिलेले पैसे परत मागितले असता शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी शैलेश गांगर्डे यांच्या विरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मंगेश क्षीरसागर हे सुकापुर तेथे राहत असून शैलेश गांगर्डे यांच्याकडून चार वर्षांपूर्वी एक गाळा सात लाखांना विकत घेतला. गाळा खरेदी करून बराच कालावधी झाला. त्यामुळे गाळ्यासाठी क्षीरसागर विचारणा करत होते. मात्र, काम पूर्ण न झाल्याने पैसे परत घेऊन टाका असे बोलल्याने दहा लाख रुपये परत करेल आणि गाळ्यासाठी घेतलेले लोन फेडेल असे ठरले. त्यानंतर वारंवार पैशाची मागणी केली मात्र पैसे दिलेले नाहीत आणि लोन फेडलेले नाही. 11 फेब्रुवारी रोजी पैसे मागितले असता पैसे देत नाही म्हणून शिवीगाळ केली आणि हातोडी त्याच्या डोक्यात मारली. या मारहाणीत मंगेश क्षीरसागर जखमी झाले. याबाबत खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.