| पनवेल | प्रतिनिधी |
जुन्या भांडणाचा राग मनात धरून दोघांनी एका इसमाला मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना पनवेल तालुक्यातील पेंधर गावात घडली आहे. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी कमलेश लालबाबू सिंह (वय 41, रा. पेंधर, मुळ गाव बिहार) यांचा बिहार येथील आपल्या मूळ गावी आरोपी पप्पुकुमार रामअवदेश सिंह (वय 30), देवकुमार रामकेश्वर सिंह (वय 32) यांच्यासोबत भांडण झाले होते. याचा राग मनात धरून दोघांनी कमलेश सिंह याला लाकडी दांडक्याने व हाताचापटाने मारहाण करुन शिवीगाळी केली या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह चव्हाण करीत आहेत.
लाकडी दांडक्याने मारहाण
