| पनवेल | वार्ताहर |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी सतवंत सिंग, सुखराज सिंग, सुखा सिंग व एका अनोळखी इसमा विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चरंजीत भूपेंद्र सिंग हा पापडीचा पाडा, खारघर येथे राहत असून तो त्याच्या मैत्रिणी सोबत राहतो. तो तब्येत ठीक नसल्याने घरी होता. त्यावेळी घराच्या टेरेसवर असताना सतवंत सिंग याने हातातील लोखंडी रॉडने डोक्यावर व पाठीत मारहाण केली व त्याचे तीन मित्र सुखराज सिंग, सुखा सिंग व एक अनोळखी इसमाने देखील मारहाण केली. यात चरंजीत सिंग जखमी झाला.