मुरुड समुद्रकिनाऱ्याचे सुशोभीकरण अंतिम टप्प्यात

11 कोटी रुपये खर्चुन बांधला जातोय संरक्षक बंधारा

| मुरुड जंजिरा | वार्ताहर |

समुद्रकिनाऱ्यावर संरक्षक बंधारा उभारण्यात येत आहे. या ठिकाणच्या सुशोभिकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच हा बंधारा स्थानिकांसह पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी दिली.

कोकणाला 720 कि.मी. लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे सहा जिल्हे या किनारी प्रदेशात येतात, तर पनवेलनजीकचा खाडी परिसर हा नवी मुंबईशी संलग्न आहे. कोकणातील समुद्र किनारे पर्यटन विकासांतर्गत विकसित करण्यासाठी राज्य सरकारने विशेष निधी दिला आहे. त्या नुसार मुरुडच्या संरक्षक बंधाऱ्यासाठी 11 कोटी 50 लाख रुपये खर्च केले जात आहेत.

संरक्षक भिंत उभारताना किनाऱ्यावर सुशोभिकरणासह पर्यटकांसाठी सोयी-सुविधा विकसीत करण्यात येत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने चेंजिंग रूम, वॉच टॉवर, आकर्षक फूड स्टॉल, पर्यटकांना बसण्यासाठी सर्वोत्तम आसन व्यवस्था करण्यात येणार आहे. समुद्र किनाऱ्यापासून फक्त दहा फुटांवर गाडी पार्ककरुन समुद्र पर्यटनाचा आनंद लुटता येणार नाही. मोठ्या संख्येने पर्यटक आले, तरी मुख्य रस्त्यावर गर्दी होणार नाही, असे नियोजन करण्यात येत असल्याकडे भुसे यांनी लक्ष वेधले.

Exit mobile version