सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

। आगरदांडा । प्रतिनिधी ।

मुरुड-जंजिरा या ठिकाणी दरवर्षी लाखो पर्यटक देश-विदेशातून येत असतात. याठिकाणी पर्यटकांची संख्या वाढावी, यासाठी मुरुड समुद्रकिनारा सुशोभीकरणासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. ते काम प्रगतीपथावर असुन या कामाचा पाहणी मुरुड जंजिरा नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी कामाचा आढावा घेऊन लवकरात लवकर काम चांगल्या पद्धतीने करावे, असे आदेश देण्यात आले.

मुरुड समुद्रकिनारा सुंदर असुन या ठिकाणी पर्यटकांना सुविधा मिळत नसल्याने पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत होती. पर्यटकांच्या दुष्टीकोनातुन मुरुड समुद्राकिनारा सुशोभिकरण केल्याने पर्यटकांची संख्येत नक्कीच वाढ होईल. आणि या मधून स्थानिकांना चांगला रोजगार मिळेल. या नगरपरिषदेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मुरुड समुद्रकिनारा सुशोभीकरण करण्याकरिता 11 कोटी 43 लाख 12 हजार 716 रुपये मंजूर करण्यात आले होते. या निधीतून सुशोभीकरण, वॉक वे, फुड जॉईट करणे, वाहनतळ व अनुषंगिक सुविधा करणे आदी सुविधांचा समावेश आसणार आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओघ वाढून यामधून स्थानिकांना रोजगार उपलब्ध सुविधा उभारण्यात येणार आहेत.

Exit mobile version