। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरुड पर्यटन क्षेत्र असल्याने पर्यटकांचे पाऊले आपोआप मुरुड पर्यटन क्षेत्र ठिकाणी येत असतात. शनिवारी -रविवारी शेकडो पर्यटक मुरुड समुद्रकिनारी येऊ लागली आहेत.यामुळे व्यवसाय तेजीत आहेत.
मुरुड समुद्रकिनारा हा मिनीगोवा म्हणुन ओळखला जातो. हा समुद्रकिनारा निळसर व स्वच्छ असुन येथील पांढर्या शुभ्र वाळुमुळे दिसणारे निळसर पाणी पर्यटकांना नेहमीच आकर्षित करीत असते. याठिकाणी देश-विदेशातून दरवर्षी लाखो पर्यटक ये-जा करित असतात. मुरुड शहरात पारा 21 अंश सेल्सिअस पोहोचला होता. यामुळे तापमान कमी झाले आणि हवा थंड वाहु लागल्या तरीही पर्यटकांनी स्वच्छ व सुंदर समुद्रात पोहण्याचा मनोसक्त आनंद घेतला तर कोणी वॉटर स्पोर्ट्स, घोडागाडी, बाईकवर आनंद घेतला. काही पर्यटक ऐतिहासिक जंजिरा किल्ला, दत्तमंदिर, गारंबी धरण, अंबोली धरण, काशिद समुद्रकिनारी पाहण्यासाठी गर्दी केली होती. यामुळे घरगुती खानावळ, हॉटेल, टपरीधारक याठिकाणी जेवण्यासाठी पर्यटकांची गर्दी दिसून येत होती. समुद्रकिनारी असणारे लॉजिंग फुल झाल्याने पर्यटन व्यवसायिक आनंदीत दिसत आहेत.