वीजपुरवठा सुरु होण्याआधीच विजेचे खांब कोसळले

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्याला वादळी वारा आणि अवकाळी पाऊस याने मोठे नुकसान केले आहे. तालुक्यात सर्व भागात विजेचे खांब कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यात वावे गावातून बेंडसेकडे जाणारी वीज वाहिनी टाकण्याचे काम महावितरणकडून करण्यात आले आहे. मात्र, त्या वीज वाहिनीवरून वीज वाहून नेण्याचे काम कारण्याआधी या वीज वाहिनीचे खांब वादळात कोसळून गेले आहे.

उमरोली ग्रामपंचायत भागातील वावे गावात वीज वाहिन्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्या भागातील बेंडसे गावातून नव्याने बांधण्यात येत असलेल्या शेडमध्ये नेण्यासाठी वीज पोहोचविली जाणार होती. त्यासाठी बेंडसे गावातून आलेली वीज वाहिनी उल्हास नदीवरून वावे गावातून शेड बांधलेल्या ठिकाणी जात होती. ते सर्व विजेचे खांब हे सहा महिन्यांपासून त्या ठिकाणी उभे आहेत. मात्र, त्या विजेच्या खांबांवरून विजेचा प्रवाह सुरु झाला नाही. मात्र, काळाच्या वादळात ते सर्व विजेचे खांब कोसळले. अवघ्या सहा महिन्यात उभे केलेले विजेचे खांब कोसळतात, यावरुन कामाबाबत उलटसुलट चर्चा करण्यात येत आहे. मात्र, 20 वर्षांपूर्वी वावे गावात उभे केलेले विजेचे खांब मात्र आजही तसेच सुस्थितीत उभे आहेत. त्यामुळे महावितरणकडून नव्याने आलेले साहित्य हे कोणत्या दर्जाचे आहे हे स्पष्ट होते, असा प्रश्‍न स्थानिक तरुण कार्यकर्ते गणेश धारणे हे उपस्थित करीत आहेत.

Exit mobile version