उड्डाणपुलावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात

| पनवेल | वार्ताहर |
नवीन पनवेल उड्डाणपुलावर गेल्या काही दिवसांपासून पडलेल्या खड्ड्यांमुळे नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे. हे खड्डे बुजवण्यासाठी अखेरीस शिवसैनिक व स्कूल व्हॅन चालकांनी पुढाकार घेऊन वाहतूक पोलिसांच्या मदतीने खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे.

उड्डाणपुलावर दरवर्षाप्रमाणे याही वर्षी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. नवीन पनवेल पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. या खड्ड्यांमुळे गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरत आहे. आता शाळा सुरू झाल्या असल्यामुळे स्कूल व्हॅनची ये-जा नवीन पनवेल पुलावरून होत असते. खड्ड्यांमुळे मुलांना शाळेत जाण्यासाठी उशीर होत आहे. याकडे सिडको प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने अखेरीस हे खड्डे बुजवण्यासाठी नवीन पनवेल शिवसेना विभागप्रमुख बिपिन झुरे, वाहतूक शाखेचे हवालदार संजय गावडे, व विद्यार्थी वाहक संतोष दाबके, गणेश रायकर, संतोष कटवले, नितीन मने, विलास पाटील आदींनी पुढाकार घेतला. त्याबद्दल नागरिकांकडून व्हॅन चालकांचे कौतुक होत आहे.

Exit mobile version