विराज टीळक यांचे उपोषण मागे

। तळा । वार्ताहर ।
किशोर पितळे:तळा नगरपंचायत प्रशासनाने दिलेल्या आश्‍वासनानंतर तळा नगरपंचायतीत विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसलेले पत्रकार विराज टिळक यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. टिळक यांनी 11 मागण्या केल्या होत्या, दोन मागण्या सोडून आम्ही त्यात आणखी काही मागण्यांची भर घालून त्या पूर्ण केल्या आहेत. आता मागे काहीच ठेवायचे नाही असा निर्णयच नगरपंचायतीने घेतला आहे. आपण लेखी आश्‍वासनाशिवाय उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका टिळक यांनी घेतली. चर्चेनंतर प्रमुख मागण्या नगरपंचायत मान्य करत असल्याचे उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे यांनी टिळक यांना सांगितले.त्याचबरोबर नगरपंचायतीने आपल्या मागण्या मान्य केल्याचे लेखी आश्‍वासन देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर फळाचा रस घेत टिळक यांनी उपोषणास तात्पुरती स्थगीती देत असल्याचे जाहीर केले.

Exit mobile version