| तळा | प्रतिनिधी |
छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचलित सरस्वती विद्या मंदिर वडघर मुद्रे आणि वनविभाग माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने “सीड बॉल” उपक्रम कार्यक्रमांतर्गत सीड बॉल रोपण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी शालेय समितीचे निमंत्रित सदस्य बाबाजी रिकामे, माणगाव क्षेत्राचे वनपाल नारायण जाधव, साई क्षेत्राचे वनरक्षक संतोष पिंगळा, उत्तेकर विभागाचे वनरक्षक पवन चौधरी, माणगावचे वनसेवक गणेश शिर्के, माझी विद्यार्थी तसेच पालक उपस्थित होते. वनपाल श्री नारायण जाधव यांनी शाळेच्या निसर्गरम्य परिसराचे कौतुक केले. या निसर्गरम्य परिसरात सिडबॉल रोपण केल्यामुळे अधिकची वृक्ष, झाडे हे वाढू लागतील आणि त्यांचा संवर्धन होईल असा विश्वास व्यक्त केला. वनरक्षक संतोष पिंगळा यांनी आपले मनोगत मांडताना सिडबॉल उपक्रमाची माहिती, सध्याची तापमान वाढ आणि पर्यावरणामधील बदल यावर मात करणारे ठरणार आहे. याकरिता ‘झाडे लावूया, झाडे जगऊया’, ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ हा वसा घेऊन आपण सर्वांनी या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.







