| खरोशी | प्रतिनिधी |
पेण येथील महाराष्ट्र सामाजिक विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मनोज गावंड यांच्या 30 वर्षांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानीत करण्यात आले. साउथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटी देशभरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्यकरणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन विद्यापीठातर्फे त्यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित करते. मनोज गावंड यांनी 1998 मध्ये महाराष्ट्र सामाजिक विकास संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा, पाणलोट विकास, एचआव्ही निर्मूलन, ग्राम समृद्धी ग्रामीण विकास, मानवी हक्क रक्षण यासह अनेक प्रकल्प राबविले. तसेच, महिलांचे हक्क, एड्स जनजागृती या सारखे उपक्रमे राबवले आहेत. मानवी हक्क या विषयातील भरीव योगदानाची दखल घेऊन साउथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटीने त्यांना मानद डॉक्टरेट पदवी चेन्नई येथे आयोजित विशेष समारंभात ग्लोबल एज्युकेशन मिशनचे डॉ. आर. सेल्वम यांच्या अध्यक्षतेखाली, तामिळनाडू क्रीडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. ए.एम. मूर्ती यांच्या हस्ते यांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित केले.







