समाज कल्याणच्या वसतिगृह, शाळांचा लाभ घ्या

। अलिबाग । प्रतिनिधी

विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा असा दिलेला संदेश आपल्या समाजातील मुला मुलींनी शैक्षणिक प्रगती करून आपल्या आई-वडिलांचे व गावाचे नाव उंच करावे, असे मार्गदर्शन पंचशील बौद्ध मंडळ खंडाळे अलिबाग यांनी आयोजित केलेल्या आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमात डॉ. जयपाल पाटील यांनी सांगितले.

याप्रसंगी व्यासपीठावर मंगेश मोरे, वैष्णवी कदम, डॉ. जयपाल पाटील उपस्थित होते. यावेळी डॉ. जयपाल पाटील यांनी रायगड जिल्ह्यात शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे मोफत चालविले जाणारे अलिबाग, पनवेल, पाली व महाड येथील मुलींचे वसतिगृह व मुलांसाठी अलिबाग, तळा, महाड येथील व जावळी माणगाव येथील दहावी पर्यंतचे माध्यमिक विद्यामंदिर याचा आपल्या समाजातील गोरगरीब, गरजवंतांनी शिक्षणासाठी लाभ घ्यावा, असे सांगितले. यावेळी कधी केव्हाही अपघात प्रसंगी 108 रुग्णवाहिकेचा वापर कसा करावा, आपली मुलगी बाळंतपणासाठी बाहेर आल्यावर तिला जिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी 102 रुग्णवाहिकेचा वापर कसा करावा, पावसाळा आता जवळ आल्याने काही वेळा वीजा कोसळतात. त्यासाठी केंद्र सरकारने ”दामिनी” अ‍ॅप काढला असून विजय बाबत सुरक्षेची माहिती मोबाईलवर कशी मिळते. महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलिसांचा 112 क्रमांकाचा वापर कसा करावा. या माहिती सोबतच महिलांनी आपल्या घरातील गॅसची काळजी कशी घ्यावी, हे सांगितले.

Exit mobile version