। अलिबाग । वार्ताहर ।
निसर्गाच्या बदला मूळे होणार्या परिणाम मूळे आपल्या वर वेगवेगळ्या आपत्या येत असतात त्याला सामोरे कसे जायचे याचे शिक्षण असणे आपल्याला गरजेचे आहे आणि रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष डॉ. किरण पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीत असे शिबिर आयोजित केले. जयपाल पाटील यांनी महिलांची स्वयंपाक घरातील गेस, वीज,गिझर,पाणी यांची व पोलीस याची सुरक्षा,अपघात महिलाना गरोदर प्रसंगी 108 चा मोफत वापर याची सुरक्षा व प्रात्यक्षिक केले.
या कार्यक्रमास जयपाल पाटील, सरपंच स्वाती सतीश पाटील, उपसरपंच प्रणिता, प्रल्हाद म्हात्रे, सुहास गानू, निलेश गावंडअनिता शेंडे, अहिल्या पाटील, ममता मानकर, रोहन पाटील, जोगळेकर, पूजा पेडणेकर वर्षा चांदोरकर, मीना गोधळी, आराधना जोशी, रुपाली आंबेतकर अंगणवाडी शिक्षिका, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, स्वाती पाटील यांनी आभार मानले.