। खांब-रोहा । वार्ताहर ।
ग्रामीण क्रिकेटला चालना मिळावी या उद्देशाने शिव छत्रपती असोसिएशन पंचक्रोशी यांच्या मान्यतेने व भैरवनाथ मालसई क्रीडा मंडळ, रोहा यांच्या वतीने किक्रेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या क्रिकेट स्पर्धेचे शानदाररित्या उद्घाटन करण्यात आले.
रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा प्रीतम पाटील, कुणबी युवक मंडळ तालुकाध्यक्ष अनंत थिटे, माजी अध्यक्ष महेश बामुगडे, युवा कार्यकर्ते निशिकांत पाटील, महेश तुपकर, हेमंत मालुसरे, ग्रा.पं. सदस्य अनिल अहिरे, निलेश मालुसरे, सदाशिव मालुसरे, नरेश मालुसरे, येणाजी शिंदे, माजी सरपंच नथुराम मालुसरे, उपसरपंच सुनील मोहिते, प्रकाश मराठे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटनीय सामना भैरवनाथ मालसई व जय भवानी मुठवली या दोन संघामध्ये झाला. या स्पर्धेत विभागातील एकूण 16 संघांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून स्पर्धेतील रंगत वाढविली.
(छायाचित्र – नंदकुमार मरवडे)