मीनाक्षी पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

राजकीय, सामाजिक आदी विविध क्षेत्रातील मंडळींची उपस्थिती

| अलिबाग | प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांचा 75 वा वाढदिवस पेझारी येथील त्यांच्या राहत्या घरी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राजकिय, सामाजिक, शैक्षणिक, बँकीग अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांसह हजारो कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेटून मीनाक्षी पाटील यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.


यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील, मधुकर भावे, माजी नगराध्यक्षा सुनिता नाईक, माजी आ. पंडित पाटील, अलिबाग अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील, प्रमोद पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील, शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, जि.प. माजी सदस्या भावना पाटील, चित्रा पाटील, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, पं. स. माजी सदस्य अनिल पाटील, संदीप घरत, अलिबाग नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, ॲड. गौतम पाटील, अजय झुंजारराव, संजना कीर, वृषाली ठोसर, अनिल चोपडा, संतोष जंगम,मनोज भगत, अजित कासार, वेश्वीच्या उपसरपंच आरती पाटील, संध्या पाटील आदी मान्यवरांसह कार्यकर्ते उपस्थित होते.


मीनाक्षी पाटील यांचे औक्षण केल्यावर केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींनी त्यांना प्रत्यक्ष भेटून, फोन करून शुभेच्छा दिल्या. सकाळी आठ वाजल्यापासून कार्यकर्त्यांची गर्दी पेझारी या ठिकाणी होऊ लागली. दहानंतर कार्यकर्त्यांनी संपुर्ण परिसर फुलून गेला. एक वेगळा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला होता. मीनाक्षी पाटील यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यामुळे त्यांना मानणारा गट मोठ्या संख्येने सकाळपासून दुपारपर्यंत पेझारी येथील त्यांच्या निवासस्थानी हजर झाला होता.

Exit mobile version