सुप्रिया पाटील, चित्रलेखा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

| अलिबाग | प्रतिनिधी |

रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्षा तथा अलिबाग अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील व शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांचा वाढदिवस शुक्रवारी अलिबागमधील वेश्वी येथील निवासस्थानी साजरा करण्यात आला.

शेतकरी, कष्टकरी, कामगारांसह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना भेटून प्रत्यक्षात शुभेच्छा दिल्या. सकाळी आठ वाजल्यापासून शुभेच्छा देण्यास सुरुवात झाली. ग्रामीण भागासह शहरी भागातील असंख्य कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली. शुभेच्छा देण्यासाठी रांग लागली होती. संपूर्ण परिसर कार्यकर्त्यांनी फुलून गेला होता.

यावेळी आ. जयंत पाटील, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे, नगरपरिषदेच्या माजी अध्यक्षा सुनिता नाईक, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, माजी उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, जिल्हा परिषद माजी सदस्या भावना पाटील, निता पाटील, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप नाईक, अनिल चोपडा, वृषाली ठोसर, संजना किर, अजय झुंजारराव, शेकापचे नेते संदिप घरत, शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील, अलिबाग पंचायत समितीचे माजी सदस्य अनिल पाटील, ॲड. सचिन जोशी, ॲड. मनोज धुमाळ, प्रमोद घासे, अशोक नाईक, महेंद्र बिद्रे, अनंत थळे, वैभव मुकादम, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ उपशाखा अलिबागचे अध्यक्ष प्रमोद भोपी, सुशील पाटील, निनाद पाटील, सतिश वारगे, मोहन थळे, दिपक म्हात्रे, रुपेश पाटील, पांडुरंग मानकर, सचिन राऊळ, संकेत राऊळ, नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर, सदस्य निखील मयेकर, नंदकिशोर तुणतूणे, मज्जीद कुर, दत्ता ढवळे, कावीरचे सरपंच राजेंद्र म्हात्रे, प्रणित पाटील, नयन पाटील, ॲड. कुंदन पाटील, योगेश गुजर, अवधुत पाटील, ॲड. के. डी. पाटील, महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघाचे अध्यक्ष विजय गिदी, शेकाप तालुका महिला आघाडी प्रमुख प्रिती पाटील, सतीश पाटील, आक्षीच्या सरपंच रश्मी पाटील, उपसरपंच आनंद बुरांडे, सदस्य रश्मी वाळंज, निरजा नाईक, अभिजीत कडवे, आदर्श पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजीत पाटील, नयन कवळे, महेंद्र पाटील, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्मचारी, रायगड बाजारचे कर्मचारी, शेकाप महिला आघाडीच्या सदस्या, पीएनपी एज्यूकेशन सोसायटीचे प्राचार्य, शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी, रायगड जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीचे आजी माजी पदाधिकारी, सदस्य, तरुणांसह ज्येष्ठ कार्यकर्ते, महिलांनी उपस्थित राहून सुप्रिया पाटील व चित्रलेखा पाटील यांना शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version