| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
मुरूड तालुका सुपारी संघाची पंचवार्षिक निवडणूक 10 डिसेंबर रोजी होत असून, या निवडणुकीसाठी तालुक्यातून एकूण 17 जागांसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीपर्यंत एकूण 40 अर्ज निबंधक सहकार संस्थेकडे दाखल झाल्याची माहिती मुरूड तालुका सहाय्यक निबंधक श्रीकांत पाटील यांनी दिली. मुरूड तालुका सहकारी सुपारी संघ ही रायगडातील नामांकित संस्था असून, येथील उत्कृष्ट सुपारी गुजरात राज्यात विविध ठिकाणी पाठविण्यात येते. या सुपारी संघाचे 1306 इतके सदस्य आहेत.







