जवळपास 40 किमीपर्यंत गाड्या अडकल्या
। खोपोली । संतोषी म्हात्रे ।
31 डिसेंबरसाठी सगळीकडचेच पर्यटक बाहेर फिरायला निघाले असल्याने सर्व रस्त्यांवर भरमसाट वाहतूक झाली असून बर्याच ठिकाणी ट्रॅफिक जॅम झाली आहे. जुन्या हायवेवरून अंडा पॉइंट वरून पुण्याकडे जाण्यासाठी गाड्या चुकीच्या दिशेने वळविल्याने सर्व गाड्या अडकून राहील्या आहेत. लोणावळ्याहून बोरघाटात येणार्या जुन्या मार्गावरील गाड्या समोरासमोर आल्याने शिंग्रोंबा पासून साधारण एक किमी च्या अंतरावर पुण्याकडे जाणार्या वाहनाच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. तर, एक्स्प्रेसवे वरून पुण्याकडे जाणार्या बाजूस भली मोठी रांग लागली असून जवळपास 39 किलोमीटरच्या पुढपर्यंत ट्रॅफिक जॅम झाली आहे. त्यामुळे बोरघाटात ट्रॅफिक खोळंबली आहे. परिणामी गरज पडल्यास पर्यटक ताम्हाणी घाटामार्गे रोहा व रोह्यावरून अलिबाग असा प्रवास करू शकतात.