। कर्जत । प्रतिनिधी ।
माजी आ.सुरेश लाड यांच्या नेतृत्वाखाली राजिप उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून व मोठ्या प्रमाणावर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तालुक्यातील होत असलेल्या विकासकामांवर प्रेरित होऊन भडवळ ग्रामपंचायतीमधील युवकांनी राष्ट्रवादी पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
यावेळी भडवळ येथील चेतन मिणमिणे, देवराम शिंगवा, कैलास वाघ, जगदीश केंगे, दामा दोरे, प्रदीप पाटील, यशवंत तुपे, अश्विन मिणमिणे, रोशन झोमटे, दीपक पाटील, नरेश जामघरे, दीपक जामघरे, जगदीश गायकर, भावेश गायकर, प्रमोद झोमटे, अश्विन मिणमिणे, आकाश वाघ, केतन शिंगवा या युवकांनी राजिप उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. याप्रसंगी उपस्थित तालुका अध्यक्ष भगवान चंचे, गटनेते शरद लाड, बळीराम देशमुख, सरपंच जाबीर नजे उपस्थित होते.







