Skp News: भाई आमचे प्रेरणास्थान: चित्रलेखा पाटील

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

“स्व. नारायण पाटील, दत्ता पाटील आणि प्रभाकर पाटील यांनी जपलेला संघर्षाचा वारसा जयंत पाटील यांनी तितक्याच ताकदीने पुढे नेला आहे. त्यांनी हजारो कार्यकर्त्यांना उभारी दिली, असंख्य कुटुंबांना आधार दिला आणि समाजसेवा हेच आपले ध्येय मानले. ‌‘ताईची सावली’सारख्या उपक्रमातून गरिबांना हक्काचे घर उभे करण्यासाठी मदतीचा हात दिला जात आहे, तर पर्यावरण संवर्धनासाठी ‌‘चित्रलेखाताई पाटील फॉर एन्व्हायर्नमेंट’च्या माध्यमातून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. भाईंच्या विचारांनी आणि संस्कारांनी आम्हाला समाजासाठी काम करण्याची प्रेरणा दिली आहे. आमच्यासाठी ते फक्त पक्षाचे नेते नाहीत, तर संकटात धीर देणारे, मार्ग दाखवणारे आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आधारवड आहेत. त्यांचे नेतृत्व अधिक मोठ्या जबाबदारीपर्यंत पोहोचावे, ही प्रत्येक कार्यकर्त्याची मनापासून इच्छा आहे,” असे प्रतिपादन शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी केले.

Exit mobile version