दळवींच्या निकटवर्तीयांचा शेकापत जाहिर प्रवेश
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील आ. महेंद्र दळवी यांचे निकटवर्ती भाई सुर्वे यांच्या कुटूंबियांनी शेतकरी कामगार पक्षात जाहिर प्रवेश केला. हा सोहळा शनिवारी (दि.26) रात्री 8 वाजता दांडा येथे पार पडला. शेकापच्या अधिकृत उमेदवारी चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन त्यांनी शेकापत प्रवेश केला असल्याचे सांगितले.
आ. दळवींनी गेल्या वर्षी मतदारांची दिशाभूल करुन, त्यांना वेगवेगळी आमिषं दाखवूल मतं मिळविली. मात्र दिलेली आश्वासनं पूर्ण्ा करण्यात ते सपशेल फेल ठरले. मतदारांसह कार्यकर्त्यांचीही फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आता अनेक कार्यकर्ते शेकापमध्ये प्रवेश करीत आहेत. सुर्वे कुटूंबियांच्या शेकाप प्रवेशामुळे मुरुडमध्ये शिंदे गटाला जोर का झटका लागला आहे.