। खेड । प्रतिनिधी ।
तालुक्यातील कळंबणी येथील राष्ट्रवादीचे काशिराम हंबीर यांनी आपल्या सर्व सहकार्यांसह आ. रामदास कदम, आ. योगेश कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. भरणे जिल्हापरिषद गटात पूर्वा श्रमीचे शिवसैनिक म्हणून मुंबईत काम केलेले काशिराम हंबीर हे निष्ठावंत कार्यकर्ते पुन्हा सेनेत सामिल झाले. त्यांच्यामुळे पुन्हा कळंबणी पंचक्रोशीत शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे. सदैव सामाजिक कार्यात हिरीरीने भाग घेऊन स्वत:चा असा एक वेगळा ठसा उमटवलेल्या हंबीर यांच्या सोबत हंबीरवाडी, दंडवाडी, माळवाडी येथील त्याचे सहकारी शिवसेनेत दाखल झाले. या कार्यक्रमाला महेश जगदाळे, दयानंद पाष्टे, रामचंद्र आईनकर, शांताराम म्हस्कर, भगवान साळुखे, महिपत पाटणे, चंदकांत सुतार, दिलीप राणे, शशिकांत चव्हाण, अण्णा कदम यांच्या सहशिवसेना पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.