कबड्डी स्पर्धेत भैरी भवानी संघाची बाजी

। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यात उल्हास क्रिडा मंडळ अंबोले यांच्यावतीने 50 किलो वजनी गटातील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन 6 मार्च रोजी केले होते. या स्पर्धेत 32 संघांनी सहभाग नोंदवला होता.

या स्पर्धेतील अंतिम सामना भैरीभवानी शिळोशी व वरदायिनी भावशेत दोन संघांमध्ये झाला. या अटीतटीच्या अंतिम लढतीत भैरीभवानी शिळोशी हा संघ विजय झाला. या स्पर्धेतील प्रथम क्रमांक शिळोशी संघास रोख रक्कम 3 हजार व चषक, द्वितीय क्रमांक वरदायनी भावशेत 2 हजार व चषक, तृतीय क्रमांक तामसोली 1 हजार व चषक, चतुर्थ क्रमांक कुंभा देवी कुंभारशेत 1 हजार व चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई करणारा लक्ष्मण लेंडी तर उत्कृष्ट पक्कड किरण बलकावडे यांना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचे बक्षीस वितरण उल्हास क्रीडामंडळ अंबोलेचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मंडळाच्या हस्ते देण्यात आले.

Exit mobile version